आठवणी दाटतात भाग ४
आठवणी दाटतात १ - मातोश्रीची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा भाग ४ ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा भाविक करतात तसेच सौ दाते बाई व आमची आई यांनी दीर्घ प्रदक्षिणा एका दिवसात केली होती आजही लोक हि प्रदक्षिणा करतात. आप्पांना जर म्हटले कि “ चला आपण गंगेवर स्नानाला जावू “ ते लगेच म्हणायचे “ अरे आपल्या नळाला त्याच गंगेचे पाणी येते. मी येथेच नळाखालीच अंघोळ करणार”. ते कधी कधी संध्याकाळी आम्हाला गंगेवर फिरयला घेवून जायचे. संध्याकाळचे गंगेच्या प्रवाहाचे दृश्य फार मनमोहक असायचे . का फेडीत पाप ताप...