आठवणी दाटतात - ११ - बोडखा लिंब
११- बोडखा लिंब आमच्या गावापासून जवळच एक कडू लिंबाचे झाड होते. त्या लिंबाच्या झाडाचे नाव जरा वेगळेच होते. त्याला सर्व लोक बोडखा लिंब म्हणायचे. तो बोडखा लिंब अनेक गोष्टीचा साक्षीदार होता. त्या झाडाखाली एक सायकलची पंकचर काढणारा बसायचा आणि तो त्याचा छोटासा व्यवसाय करायचा. त्यावेळी प्रसिध्द वाहन म्हणजे सायकल. त्या बोडख्या लिंबाखाली एक ज्योतिषी सुद्धा बसायचा , टाकली मिया येथील होता तो मराठा समाजातील होता. जाणारे येणारे उन्हामुळे याच झाडाच्या सावलीमध्ये विसावायचे कधी कधी प्रेमी जोडपे सुद्धा याच झाडाच्या सावलीला गुज गोष्टी करीत असायचे आम्हाला त्यांचे अप्रूप वाटायच. या झाडाला बोडखा लिंब का म्हणत असायचे हे मात्र आम्हाला समजत नसायचे म्हणून आम्ही गावातील एका जुन्या व्यक्तीला विचारले “ या झाडाला बोडखा लिंब का म्हणतात? ” तेव्हा त्यांनी सांगितले कि हे झाड एकदा बुंध्यापासून तोडले होते पण याची मुळे ...