पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आठवणी दाटतात - भाग - ९

इमेज
                                  आठवणी दाटतात                                        ९  - जंगली बाबा                                          भाग - ९                (फोटो  प्रातिनिधिक स्वरूप आहे )                             एक फार महत्वाचा विषय मला तुम्हाला सांगायचा आहे . आमच्या बाणेश्वर मंदिरात एक नागा साधू येत असे त्यांना  लोक जंगली बाबा म्हणायचे . खूप पोहचलेला होते . माझी आणि त्यांची फार गट्टी जमली होती . बाबा अंगापिंडाने चांगले धडधाकट होते उंच होते . त्यांनी त्यांचे चारीत्र  मला सांगितले होते. ते हरियाणाचे होते पण स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तीने भारावून ते...

आठवणी दाटतात- भाग -८

इमेज
                                         आठवणी दाटतात                                      भाग -८     उत्तर प्रदेशाचे रामलीला पथक                  आमचे गावात त्या वेळी म्हणजे साधारण १९७३-१९७४ दरम्यान रामलीला पथक यायचे हे लोक उत्तर प्रदेशचे असायचे ते लोक हिंदी आणि व्रज भाषेत बोलत असत. मराठी त्यांना समजत नसे पण त्यावाचून काही अडत नसे . त्यांचा मुक्काम मारुतीच्या मादिरातच असायचा . दिवसभर गावात फिरायचे व लोकसंपर्क जोडायचे , त्यांचे बोलणे मोठे प्रेमळ असायचे . “ केल्याने देशाटन सभेत संचार पांडित्य येत असे फार “ हे खरे आहे. ते मारुतीच्या मंदिरात पुराणातील कथा , रामायण , कृष्ण लीला असे करीत असत . ते लोक अगदी कसलेले नट असत. महिना महिना ते गावात राहत असत त्यांना ज्वारी , गहू दिले तरी चालत असे. कार्यक्रम रात्री साधारण ८-९ वाजता सुरु होत असे ...

आठवणी दाटतात भाग -७

इमेज
                                            आठवणी दाटतात                                                          भाग -७                     किसन महाराज त्या वेळी काही बाहेरची बाधा वगैरे आहे का ते सुद्धा बघत असत आसपासचे लोक आजारी वैगरे असले कि त्यांच्याकडे येत असत व काहींना बरे पण वाटत असे आज आपण अंधश्रद्धा म्हणू पण त्यावेळी असे काही बोलायची लोकांची तयारी नसायची . एकदा काय झाले गावातील एक माणूस नगरला कामाला जायचा तो संध्याकाळी घरी आला आणि बायकोचे नाव घेऊन म्हणायला लागला “ xxx अग ! मी मेलो आता , अग ! मी मेलो आता ” हे पालुपद सारखे सुरु होते. त्याची बायको बिचारी घाबरून गेली आणि तिने मग त्याला किसन महाराजानकडे  आणले . महाराजांनी त्याला बघीतले आणि सांगितले कि “बाधा फार मोठी आहे.” न...

आठवणी दाटतात भाग ६

इमेज
                                                           आठवणी दाटतात                                               भाग -६   -    भजनाचा    छंद लागला                                                                          शालेय , महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतांनाच मला भजनाचा   छंद लागला . आमचे गावात एक मारुतीचे जुन्या पद्धतीचे मंदिर होते. तेथे एकादशी , सोमवार , गुरुवार व पर्वकाळी भजन असायचे पण आम्ही तेव्हा माळकरी नव्हतो. भजनी मंडळी आमचा राग करीत असत, आम्हाला लवकर धृपद म्हण्याची सुद्धा संधी देत नसत . पण ...

आठवणी दाटतात भाग ५

इमेज
                                 आठवणी  दाटतात                           १ -  शालेय जीवन                                                 भाग -५                  १९६७ साली वडिलांची बदली नगरला झाली आणि माझ्या आयुष्याचे दुसरे पर्व सुरु झाले. तत्पूर्वी वडिलांनी आमचे मूळ गाव बुर्हानगर येथे अगोदरच घर (माडी) बांधले होते त्यामुळे रहाण्याचा प्रश्न नव्हता . आमच्या गावापासून ४ किलोमीटर अंतरावर नगरला मराठा विद्या प्रसारक समाजाचे रेसिडेन्सीयल हायस्कूलमध्ये सातवीला प्रवेश घेतला . मला वाचनाची आवड होती त्याला पोषक वातावरण या शाळेतील वाचनालयात मिळाले वाचनालय प्रमुख श्री शेळके सर होते. माझा मित्र देवराम बारस्कर जो आता चार्टड अकौटांट आहे . आम्हाला दोघानाही वाचनाची आव...