पोस्ट्स

आठवणी दाटतात भाग १

इमेज
                    आठवणी दाटतात                        १ -  स्वन्तन्त्र्योत्तर काळातील आमचे प्रगटन                                          भाग १                             माझी   आई (शांताबाई सदाशिव कर्डिले ) आम्ही तिला बाई म्हणत असू .  बालपणापासून पारमार्थिक होती   तिचे माहेर शेवगाव तालुक्यातील आव्हाने हे होते . तेथून ती लहानपणापासून महिन्याच्या प्रत्येक एकादशीला पैठणची वारी करीत असे त्यामुळे तिला गंगास्नान आणि सत्संग सहज घडत असे. तोच संस्कार तिच्या अंत:करणावर राहिला व आमचे गावात कोणी संत आले आले कि आई   त्यांचे प्रवचन ऐकायला जात असे . परमार्थाचे सर्व संस्कार मला आईकडूनच मिळाले . वडील श्री सदाशिव कर्डिले ( आम्ही त्यांना आप्पा म्हणत असू )  नासिक...

आठवणी दाटतात - ११ - बोडखा लिंब

इमेज
                          ११-      बोडखा लिंब              आमच्या गावापासून जवळच एक कडू लिंबाचे झाड होते. त्या लिंबाच्या झाडाचे नाव जरा वेगळेच होते. त्याला सर्व लोक बोडखा लिंब म्हणायचे. तो बोडखा लिंब अनेक गोष्टीचा साक्षीदार होता. त्या झाडाखाली एक सायकलची पंकचर काढणारा बसायचा आणि तो त्याचा छोटासा व्यवसाय करायचा. त्यावेळी प्रसिध्द वाहन म्हणजे सायकल. त्या बोडख्या लिंबाखाली एक ज्योतिषी सुद्धा बसायचा , टाकली मिया येथील होता तो मराठा समाजातील होता. जाणारे येणारे उन्हामुळे याच झाडाच्या सावलीमध्ये विसावायचे   कधी कधी प्रेमी जोडपे सुद्धा याच झाडाच्या सावलीला गुज गोष्टी करीत असायचे आम्हाला त्यांचे अप्रूप वाटायच. या झाडाला बोडखा लिंब का म्हणत असायचे हे मात्र आम्हाला समजत नसायचे म्हणून आम्ही   गावातील एका जुन्या व्यक्तीला विचारले “ या झाडाला बोडखा लिंब का म्हणतात? ” तेव्हा त्यांनी सांगितले कि हे झाड एकदा बुंध्यापासून तोडले होते पण  याची मुळे ...

आठवणी दाटतात भाग १०

इमेज
                                                         आठवणी दाटतात                                          भाग १०- मौनी बाबा                           असेच एक मौनी बाबा होते त्यांचे नाव “ गोडबोले” होते ते कोकणातील होते पण हे सुरवातीला माहित नव्हते ब्राह्मण होते कमरेला एक शेला लपेटलेला होता व अंगावर अशीच एक शाल असे ते हि बाणेश्वर  मंदिरात असत कोणी काही दिले तर खात होते व एरव्ही मराठीतील प्रसिध्द लेखकांचे पुस्तके वाचीत असत. ते सतत मौन धरूनच असत कोणासीही  बोलत  नसत . माझी आणि त्यांची चांगली मैत्री जुळली होती. मी त्यांना काही प्रश्न विचारायचो त्याची उत्तरे ते एका कागदावर लिहून द्यायचे त्यांना विचारले कि तम्ही मौन का धरले तर ते म्हणायचे मी मौन धर...

आठवणी दाटतात - भाग - ९

इमेज
                                  आठवणी दाटतात                                        ९  - जंगली बाबा                                          भाग - ९                (फोटो  प्रातिनिधिक स्वरूप आहे )                             एक फार महत्वाचा विषय मला तुम्हाला सांगायचा आहे . आमच्या बाणेश्वर मंदिरात एक नागा साधू येत असे त्यांना  लोक जंगली बाबा म्हणायचे . खूप पोहचलेला होते . माझी आणि त्यांची फार गट्टी जमली होती . बाबा अंगापिंडाने चांगले धडधाकट होते उंच होते . त्यांनी त्यांचे चारीत्र  मला सांगितले होते. ते हरियाणाचे होते पण स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तीने भारावून ते...

आठवणी दाटतात- भाग -८

इमेज
                                         आठवणी दाटतात                                      भाग -८     उत्तर प्रदेशाचे रामलीला पथक                  आमचे गावात त्या वेळी म्हणजे साधारण १९७३-१९७४ दरम्यान रामलीला पथक यायचे हे लोक उत्तर प्रदेशचे असायचे ते लोक हिंदी आणि व्रज भाषेत बोलत असत. मराठी त्यांना समजत नसे पण त्यावाचून काही अडत नसे . त्यांचा मुक्काम मारुतीच्या मादिरातच असायचा . दिवसभर गावात फिरायचे व लोकसंपर्क जोडायचे , त्यांचे बोलणे मोठे प्रेमळ असायचे . “ केल्याने देशाटन सभेत संचार पांडित्य येत असे फार “ हे खरे आहे. ते मारुतीच्या मंदिरात पुराणातील कथा , रामायण , कृष्ण लीला असे करीत असत . ते लोक अगदी कसलेले नट असत. महिना महिना ते गावात राहत असत त्यांना ज्वारी , गहू दिले तरी चालत असे. कार्यक्रम रात्री साधारण ८-९ वाजता सुरु होत असे ...

आठवणी दाटतात भाग -७

इमेज
                                            आठवणी दाटतात                                                          भाग -७                     किसन महाराज त्या वेळी काही बाहेरची बाधा वगैरे आहे का ते सुद्धा बघत असत आसपासचे लोक आजारी वैगरे असले कि त्यांच्याकडे येत असत व काहींना बरे पण वाटत असे आज आपण अंधश्रद्धा म्हणू पण त्यावेळी असे काही बोलायची लोकांची तयारी नसायची . एकदा काय झाले गावातील एक माणूस नगरला कामाला जायचा तो संध्याकाळी घरी आला आणि बायकोचे नाव घेऊन म्हणायला लागला “ xxx अग ! मी मेलो आता , अग ! मी मेलो आता ” हे पालुपद सारखे सुरु होते. त्याची बायको बिचारी घाबरून गेली आणि तिने मग त्याला किसन महाराजानकडे  आणले . महाराजांनी त्याला बघीतले आणि सांगितले कि “बाधा फार मोठी आहे.” न...

आठवणी दाटतात भाग ६

इमेज
                                                           आठवणी दाटतात                                               भाग -६   -    भजनाचा    छंद लागला                                                                          शालेय , महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतांनाच मला भजनाचा   छंद लागला . आमचे गावात एक मारुतीचे जुन्या पद्धतीचे मंदिर होते. तेथे एकादशी , सोमवार , गुरुवार व पर्वकाळी भजन असायचे पण आम्ही तेव्हा माळकरी नव्हतो. भजनी मंडळी आमचा राग करीत असत, आम्हाला लवकर धृपद म्हण्याची सुद्धा संधी देत नसत . पण ...