आठवणी दाटतात भाग १०

                                                         आठवणी दाटतात 

                                        भाग १०- मौनी बाबा 


                       असेच एक मौनी बाबा होते त्यांचे नाव “ गोडबोले” होते ते कोकणातील होते पण हे सुरवातीला माहित नव्हते ब्राह्मण होते कमरेला एक शेला लपेटलेला होता व अंगावर अशीच एक शाल असे ते हि बाणेश्वर  मंदिरात असत कोणी काही दिले तर खात होते व एरव्ही मराठीतील प्रसिध्द लेखकांचे पुस्तके वाचीत असत. ते सतत मौन धरूनच असत कोणासीही  बोलत  नसत . माझी आणि त्यांची चांगली मैत्री जुळली होती. मी त्यांना काही प्रश्न विचारायचो त्याची उत्तरे ते एका कागदावर लिहून द्यायचे त्यांना विचारले कि तम्ही मौन का धरले तर ते म्हणायचे मी मौन धरले नाही तर आमच्या  दुष्ट नातेवाईकांनी करणी करून माझी वाचा बंद केली आहे. त्यांच्यामुळे मला वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके वाचायला मिळायची मला वाचनाचा छंद असल्यामुळे मीही त्यांच्या संपर्कात्य आलो.  पिंपळपान  , स्मरणगाथा , मृणमयी , काही कथासंग्रह , कादंबरी असे वेगवेगळे प्रकार मला वाचावयास मिळाले. श्री गोडबोले बाबा हे अहमदनगर वाचनालयाचे सभासद पण होते व त्यांनी हे कसे जुळवले हे त्यांचे  त्यांनाच माहित . त्यांच्या हातावर एक सहा इंचाची जखम होती मला वाटले हे काहीतरी गुन्हेगारीचे कृत्य तर नसावे ? जर भीतीच वाटली तरीही मी त्यांना धाडस करून विचारले ,” बाबा ! हि हाताला जखम कशी झाली?” त्यांना हसू आले ,” अशोक ! तुला काय वाटले हे माझ्या लक्षात आले . अरे मी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस नाही .मी इथे येण्यापूर्वी सावेडीला एका मंदिरात राहत होतो . तेथेही माझेबोलू शकत नव्हतो. एक दिवस मी एका विहिरीच्या जवळ उभा होतो कसा काय कोण जाने पण मी पाय घसरून विहिरीत पडलो मला तर बोलता येत नव्हते तसे दोन तीन तास कडेला खडकाला हात धरून उभा राहिलो त्याच वेळी तेथे एक काटेरी तर होती आणि ती तर माझ्या हाताला लागली व त्यातूनच हि जखम झाली. खाजगी औषधे करून हि जखम बरी केली आणि मग इकडे बु-हानगरला बाणेश्वर मंदिरात आलो व तुझी भेट झाली .” अर्थात हे बाबांनी सर्व  लिहूनच दाखवले. (असेच एक बाबा होते , त्यांचे नाव शेंगदाणे बाबा असे होते. ते पण मौन धरून होते पण ते पुटपुट करून हळू आवाजात बोलायचे व लिहूनही दाखवायचे. त्यांची पूर्ण हकीगत मी पुढे सांगणार आहे. या अनुषंगाने आठवले म्हणून लिहिले )  त्यांचे नेहमी मला सांगणे होते कि अशोक तू तुझे वाचन वाढव तुला पुढे उपयोग होईल. त्यांचे म्हणणे खरे ठरले. मला वाचनाचा छंद होताच तो आणखी वृद्धींगत झाला. आज माझे  स्वतंत्र  वाचनालय आहे.वाचन हे जीवनात अत्यंत महत्वाचे आहे.  पुस्तकांची श्रीमंती हि सर्वात श्रेष्ठ असते. विचार आणि ज्ञानाच्या  कक्षा रुंद्वतात. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणी दाटतात भाग १

आठवणी दाटतात भाग २

आठवणी दाटतात भाग ३