आठवणी दाटतात - भाग - ९
आठवणी दाटतात
९ - जंगली बाबा
भाग - ९
(फोटो प्रातिनिधिक स्वरूप आहे )
एक फार महत्वाचा विषय मला तुम्हाला सांगायचा आहे . आमच्या बाणेश्वर मंदिरात एक नागा साधू येत असे त्यांना लोक जंगली बाबा म्हणायचे . खूप पोहचलेला होते . माझी आणि त्यांची फार गट्टी जमली होती . बाबा अंगापिंडाने चांगले धडधाकट होते उंच होते . त्यांनी त्यांचे चारीत्र मला सांगितले होते. ते हरियाणाचे होते पण स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तीने भारावून ते सुभाषचंद्र बोस म्हणजेच बाबूजी यांच्या “ आझाद हिंद “ सेनेत भारती झाले होते . त्यांना बाबुजींनी एक काम सांगितले ते म्हणजे एक इंग्रज अधिकारी होतां त्याला संपवायचे आणि यांना आणखी एक जोडीदार दिला . ठरले सर्व व्यवस्था झाळी दोघांना दोन पिस्तुले देण्यात आली. “करो या मारो “ हा त्यावेळचा नारा होता. जंगली बाबा हे मला सगळ सांगत होते. बाबा म्हणाले ,” बेटा ! हम दोनोने बुरखा ओढ लिया और वो अंग्रेज सिनेमा देखणे कौनसे थियेटरमे जा रहा ये खबर हमको मिली और हमने दो टिकट उसके दोनो बाजुके खरीद लिये| और सिनेमा देखने हम गये ओ ऑफिसर उसके कुर्शिपर बैठा था | हम दोनोने बुरखा पहेना था | उसको तो बहोत अच्छ लागा हमने भी उसको जरा चीपके उसको उल्लू बनाया और जैसे सिनेमा सुरु हुवा वैसे हम दोनोने दोनो तरफसे पिस्तुलकी सारी गोलिया उसकी छातीमे दाग दि और उसी वक्त भाग निकले | लेकीन पकडणे का दर बहुत सता रहा था | मेरा साथी कहा गया कूछ मालूम नाही | मैने सीधा हिमालयका रास्ता पकाडा | और नागा साधुओमे सामील हो गया | बारा बरस उनमे रहा, उन्होने मेरी सारी कसोटी ली उन्मे मै पास हो गया .... फिर भारत स्वंतत्र हुआ और मेरे गुरुजीने कहां कि अब तू भारत भ्रमण कर और हिंदू धर्मका प्रचार कर | इसलिये मै सदा घुमता राहता हु | साधू घुमता भला और नदी बहेती भली |”जंगली बाबाला काही सिद्धी सुद्धा प्रसन्न होत्या. तसे ते अगदी निस्पृह होते कोणाला काही मागत नव्हते . एक दिवस बाणेश्वर कॉलनीतील प्रतिष्ठित गृहस्थ आले त्यांनी बाबांना साखरेचा एक मोठा पुडा दिला पण देतांना त्यांच्या ठिकाणी थोडा अहंकार दिसला . बाबांच्या झोपडीसमोर एक यज्ञकुंड सतत तेवत असायचे , बाबांनी तो साखेचा पुडा त्या यज्ञकुंडात दिला टाकून . हे गृहस्थ जरा नाराज झाले , बाबा लगेच म्हणाले ,” तुमने बाबाको दिया ना ? तगो फिर बाबा कुच्छ भी करेगा वो खुद खायेगा या अग्निमे अर्पण करेगा तुम नाराज ना होना |”
बाबा गांज्या ओढत असत नगरच्या एका व्यापा-याने साधारण एक दोन किलो गांज्या बाबाला दिला आणि रुबाबात म्हणाला “ बाबा घ्या भोलेका प्रसाद !” बाबांनी तो गांज्या घेतला आणि अग्नी कुंडात दिला टाकून तो व्यापारी तो गांज्या कुंडातून काढायला लागला तोच बाबांनी त्याला इक इरसाल शिवी दिली आणि सांगितले “ये गांज्या बाबाका है , बाबा कुच्छ भी कर सकता है , तू हात मत लागा |
बाबांच्या ह्या वागण्यात एक अध्यात्म होते पण समजून घेणारे मात्र फार कमी होते. माझ्यावर त्यांचे विशेष प्रेम होते . शिकण्याविषयी मला प्रेरित करीत असत. काही योगीक साधना पण सांगत असत. त्यामध्ये बिंदू त्राटक, अनाहत अनुसंधान याविषयी सांगत असत. बाबांचे एक वैशिष्ट्य होते जेथे जात असत तेथे एक कुटीया बंधित व जेव्हा तेथून निघायचे तेव्हा ती कुटीया जाळून टाकीत व निघून जात असत , मी बाबांना विचारले कि ,” बाबाजी अप जहा जाते हो वहा कुटीया बनाते है और वहसे निकलते वक्त वो कुटीया जलाते क्यो ?” अरे बेटा ! मै कुटीया इस लिये जलाता हु कि मै कहा भी जाऊ मेरे अंत:करणमी ऐसा नाही आणा चाहिये कि मेरी कुटीया वाहा है |”
होळी पौर्णिमेचा सण होता किसन महाराज व आम्ही काही लोक तेथेच होतो बाबा म्हणाले वो गावमे कैसा शोर मच रहा है ? किसन महाराज म्हणाले ,” बाबा गावात होळीचा सण आहे “ “अरे किसन ये गावमे ग्रहस्थ लोगोकी होली है , ये लबाड लोग होते है घरमे राहते है और होली घरके बाहर मानते है | तुने कभी साधुकी होली देखी है ? “ किसन महाराज म्हणाले नाही कशी असते साधूची होळी ? बाबा म्हणाले ,” ला माचीस तुझे दिखता हु साधुकी होली आणि यांनी त्यांना माचीस दिली बाबांनी ती माचीस घेतली आणि कडी पेटवून दिली ठेवून त्यांच्या कुटीयावर , ज्यामध्ये मोठा हार्मोनियम होता काही धान्य व इतर समान . ती कुटीया धडाडून पेटली . किसन महराज मोठ्याने म्हणू लागले “बाबा त्याच्यात खूप समान आहे “ चूप बैठ मैने तुझे कहां था ना कि साधूकि होली कैसी होती है , देख अच्छी तरह साधुकी होली कैसी होती है ! आया समजमे अब मै चला |” आणि त्याच वेळी बाबा गेले कुठे गेले कोणालच माहित नाही .. संत कबीर महराज म्हणतात ,” खडा कबीरा बाजारमे लीये लुकाटी हाथ , जो घर फुके अपने हाथ चलो हमारे साथ || “ कबीर महराज म्हणतात मी बाजारात उभा आहे ज्याला आमच्या बरोबर यायचे आहे त्याने आपल्या हाताने आपले घर अग्नीच्या हातात द्यावे आणि आमच्याबरोबर यावे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात ,” आपलेनी हाते लावोनिया आगी | पाहू नये मागे परतोनी || व ते स्वत: पण तसेच होते पुढे म्हणतात ,” जळोनी संसार बैसलो अंगणी |तुझे नाही मनी मानसी हे ||” प्रखर वैराग्याचे हे लक्षण आहे . जंगली बाबा हे महान संत होते वैराग्यवान साधू होते. क्रमश: १०

जाळने हा शब्द महाराजांनी अंतःकरण पंचकमेटीपासुन होणारया विषयरुपी कर्माबद्दल उद्देषुन संबोधला असेल. बाह्य साधनासाठी नसेल.
उत्तर द्याहटवाजय हरी खरे तर महाराजांना तेच म्हण्याचे यात शंका नाही .
उत्तर द्याहटवा