आठवणी दाटतात - ११ - बोडखा लिंब

 

               
      
११-
    बोडखा लिंब

            आमच्या गावापासून जवळच एक कडू लिंबाचे झाड होते. त्या लिंबाच्या झाडाचे नाव जरा वेगळेच होते. त्याला सर्व लोक बोडखा लिंब म्हणायचे. तो बोडखा लिंब अनेक गोष्टीचा साक्षीदार होता. त्या झाडाखाली एक सायकलची पंकचर काढणारा बसायचा आणि तो त्याचा छोटासा व्यवसाय करायचा. त्यावेळी प्रसिध्द वाहन म्हणजे सायकल. त्या बोडख्या लिंबाखाली एक ज्योतिषी सुद्धा बसायचा , टाकली मिया येथील होता तो मराठा समाजातील होता. जाणारे येणारे उन्हामुळे याच झाडाच्या सावलीमध्ये विसावायचे  कधी कधी प्रेमी जोडपे सुद्धा याच झाडाच्या सावलीला गुज गोष्टी करीत असायचे आम्हाला त्यांचे अप्रूप वाटायच. या झाडाला बोडखा लिंब का म्हणत असायचे हे मात्र आम्हाला समजत नसायचे म्हणून आम्ही  गावातील एका जुन्या व्यक्तीला विचारले

या झाडाला बोडखा लिंब का म्हणतात? तेव्हा त्यांनी सांगितले कि हे झाड एकदा बुंध्यापासून तोडले होते पण  याची मुळे काढता नाही आली आणि त्याचा परिणाम असा झाला कि हे झाड पुन्हा हिरवेगार झाले व उंच वाढले आणि पुन्हा पहिल्यासारखे झाले. हि गोष्ट सांगण्यामागे माझा एक हेतू होता तो म्हणजे आपली संस्कृती अमरत्वाचे तत्वज्ञान शिकवते तिचे म्हणणे असे आहे कि या विश्वात काहीही मर्त्य नाही हेच झाड तोडले होते पण ते पुन्हा पाहिल्यासारखे हिरवेगार झालेच आणि दुसरा विचार म्हणजे जरी ते झाड उगवले नसते तरी ज्या बीजापासून ते झाड उगवले होते त्याला परिपक्व झाल्यावर बीजाचा वृक्ष झाला आणिपुढे परत त्याला फुले, बहर येवून तेच बीज वा-याबरोबर सर्वत्र उडत जावून सर्वत्र बीजारोपण झाले आणि याच बोडख्या लिंबाचे पुन्हा झाड तिकडे उगवले व बोडखा लिंब हा संकोचित राहिला नाही तर तो व्यापक झाला.उपनिषदात सांगितले आहे कि एकोsहम बहुस्यामप्रजयेती(छांदोग्य उपनिषद) मी एकटाच अनेक अनेक झालो आहे. किंवा एकम सद विप्रा बहुदा वदन्ति(ऋग्वेद) सत्य एकाच आहे व तेच सत्य अनंत प्रकाराने सांगितले जाते. हे सनातन सत्य कीर्ती सार्थ आहे भौतिक रूपातही तेच अनुभवला येते या बोडख्या लिंबाने हे अनमोल  तत्वज्ञान शिकविले. तो मात्र या सर्वांचा साक्षी होता. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणी दाटतात भाग १

आठवणी दाटतात भाग २

आठवणी दाटतात भाग ३