आठवणी दाटतात भाग २
आठवणी दाटतात
१ -नासिक - ब्रिटीशांची मुले
भाग २
( क्रमश:-२ )नासिक हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे आमचेकडे सतत पाहुण्यांची वर्दळ असायची. बुर्हानगर व नगरच्या आसपासचे नातेवाईक नासिकला आले कि आमचेकडे उतरायचे व मी त्यांचा मार्गदर्शक असायचो आई मला म्हणायची तू यांच्याबरोबर त्रिंबकेश्वरला जावून ये मग मी त्यांच्याबरोबर त्रिंबकेश्वरला , ब्र्हमगिरी येथे जावून यायचो तोपर्यंत संध्याकाळ व्हयाची आणि मग रात्री चर्चा व जेवण व्हायची आणि दुसर्या दिवसी रामकुंड वैगैरे ठिकाणी जावून यायचो मला त्यांच्यामुळे सहज फिरणे व्हायचे व गंगा स्नान घडून फुकटचे पुण्य पदरात पडायचे .
धर्माचा स्वाभिमान बालपणापासूनच अंत:कारणात
दृढ होता मिशनरी शाळेत होतो तेथे सकाळी वर्गात जायचे अगोदर सामुदायिक प्रार्थना
होत असे त्यात " हे आकाशातील बापा ...." अशी प्रार्थना सुरु झाली कि आम्ही हात
जोडीत नसत कारण आम्हाला ऐकून तरी माहित होते कि आपला बाप वर आकाशात नसून तो
सर्वत्र आहे . पण तेथील शिक्षिका कुरडे
बाई छडी घेवून आम्हाला हातावर मारीत व म्हणायच्या ये !देवाची प्रार्थना म्हण नाही
तर नापास होशील .” त्या नापासाचा भीतीने नाईलाजाने हात जोडावे लागत, पण मनात मात्र जय
श्रीराम म्हणायचो .
आमच्या या शाळेपासून जवळच युरोपियन
माणसे आणि काही मुले वसतिगृहात राहत होते
ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशी गेले नव्हते . त्यांना बघितले कि आमचे
पित्त खवळत असे मग आमच्यातील काही मुले
त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असत आमच्यातील स्वदेशाभिमान इतका तीव्र असे.
रामदास मंडलिक माझा मित्र होता तो म्हणायचा “ "अरे अशोक ! तुला माहित आहे का यांच्या
बापांनी आपल्या लोकांना मारले आहे आणि हे xxxx अजून इथेच आहेत त्यांच्या
गावाला जात पण नाहीत . “ मी त्याला
म्हणालो “" रामदास ! त्यांचे गाव जवळ नाही साता समुद्रापलीकडे आहे " तुला कस काय
माहित रे ?” अरे मी आमच्या दाते बाईंना विचारले होते त्यांनीच मला सांगितले.” मग आपण द्यायचे त्यांना हाकलून !” येडा आहे का
रे तू ? आपल्याला मारतील ते “. तो म्हणतो कसा आपल्याला काय हात नाहीत काय ?” आणि खरी गम्मत अशी कि आमच्यातील एक टारगट पोरगा
जिद्दीला पेटला आणि जेव्हा त्या युरोपियन मुलांचा घोळका फिरायला निघाला तेव्हा हा
त्यांच्या घोळक्यात घुसला आणि दोन तीन मुलांना व मुलींना झोडपून काढले आणि पळून गेला .
आम्हाला त्यांच्या रक्षकाने विचारले कि तो मुलगा कोण होता ? आम्ही सगळ्यांनी
सांगितले कि आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही शाळेतून घरी चाललो आहोत . विशेष असा इतिहास आम्हाला माहित नव्हता पण मोठ्या माणसांच्या चर्चा ऐकून
आमच्यावरही परिणाम होत होता.त्या युरोपियन मुलांचा आम्हाला भयंकर राग यायचा.
त्यांचा एक सुरक्षा रक्षकाकडे एक बंदूक पण असायची आम्हाला
त्याची फार भीती वाटायची . नंतर एक दोन वर्षात ती सर्व मंडळी नासिक सोडून गेली म्हणजे
त्यांच्या देशात गेली असतील.

खुपच भाग्यवान आहात आपण माऊली. बालपणी हराची व संपुर्ण आयुष्यभर हरिची सेवा आपल्याकडून घडली. खुपच छान 🙏💐🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद माऊली ! खरे आहे आपले म्हणणे. माझ्या आईची पुण्याई आहे.
हटवाजय हरि महाराज खरो खर तुम्ही धन्य आहा तुम्हाला धारमीक आई मिळाली व नाशिक सारख्या पवित्र भुमिचा सहवास. लाभली खरो खर तुम्ही धन्य आहात
उत्तर द्याहटवाहो खरेच मला आई धार्मिक मिळाली म्हणूनच मला परमार्थलाभ झाला. धन्यवाद माऊली
हटवाखूप छान आहे. 👌👌
उत्तर द्याहटवाजय हरी महाराज🙏🙏
धन्यवाद माऊली
हटवा🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाखूपच छान माऊली!
उत्तर द्याहटवाराम कृष्ण हरि!
राम कृष्ण हरि!
उत्तर द्याहटवाराम कृष्ण हरी माऊली
हटवा