आठवणी दाटतात भाग १
आठवणी दाटतात
१ - स्वन्तन्त्र्योत्तर काळातील आमचे प्रगटन
भाग १
माझी आई (शांताबाई सदाशिव कर्डिले ) आम्ही तिला बाई म्हणत असू . बालपणापासून पारमार्थिक होती तिचे माहेर शेवगाव तालुक्यातील आव्हाने हे होते . तेथून ती लहानपणापासून महिन्याच्या प्रत्येक एकादशीला पैठणची वारी करीत असे त्यामुळे तिला गंगास्नान आणि सत्संग सहज घडत असे. तोच संस्कार तिच्या अंत:करणावर राहिला व आमचे गावात कोणी संत आले आले कि आई त्यांचे प्रवचन ऐकायला जात असे . परमार्थाचे सर्व संस्कार मला आईकडूनच मिळाले . वडील श्री सदाशिव कर्डिले ( आम्ही त्यांना आप्पा म्हणत असू ) नासिक येथे पाटबंधारे ख्यात्यामध्ये नोकरीला होते त्यावेळी तेथे के आर दाते हे अधीक्षक अभियंता होते वडील त्यांच्या केबिनवर नाईक म्हणून होते त्यामुळे त्यांचा आणि आमचा चांगला संबंध आला होते. माझी आई पण त्यांच्या घरी धुणे भांडे करीत असे तिलाही त्यांच्याकडून पगार मिळत असे. प्रपंचासाठी दोघेही खूप कष्ट करीत असत. पण अशाही परीस्थित आईने परामर्थ सोडला नाही. गावाकडचे कोणीही नासिकला आले कि त्यांची सर्व सोय आमचेकडे होत असे आम्ही त्रिंबक रोडवर पाटबंधारे कॉलनीत राहत होतो. मी शरणपूर येथे संत अन्द्रीये या ख्रिश्चन शाळेत होतो दुसरी ते सहावीपर्यंत माझे शिक्षण तेथेच झाले . गोदावरीचा कालवा आमचे घरासमोरून वहात होता त्यामुळे सहजच गंगा स्नान होत होते.
श्री दाते साहेबांच्या बंगल्यावर त्यांच्या
मुलांबरोबर खेळायला जात असे व त्यांची स्वतंत्र लायब्ररी होती मला तेथील पुस्तके
वाचण्याची परवानगी होती मला खरी वाचनाची आवड येथूनच लागली. छोटे मह्भारत रामायण,
सिंदबादच्या सात सफरी , अरबी भाषेतील सुरस कथा व इतर लहान मुलांचे पुस्तके वाचून
काढली. मला खरे तर येथूनच वाचनाचा संस्कार लागला. ............क्रमश:

Pudhe
उत्तर द्याहटवाक्रमशः: अपलोड करतो
हटवामहाराज पुढील भाग लवकर टाका आतुरता लागली
उत्तर द्याहटवाराम कृष्ण हरी माऊली
हटवा🙏🙏🙏
उत्तर द्याहटवापुढील भागाची वाट पाहतोय...😊
धन्यवाद क्रमशः: अपलोड करतो
हटवाजय हरि महाराज पुढील माहीती लवकर टाका
उत्तर द्याहटवापरमपूज्य सद्गुरु चंपा माईंचा अनुग्रह अभ्यास आपणास मिळाला त्यापुढील वृत्तांत लवकर सांगा वा गुरु महाराज की जय🕉️ जय गुरुदेव🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद क्रमशः: अपलोड करतो
हटवाधन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या सुंदर अभिप्र्याबद्दल आभारी आहे. व हीच खरी प्रेरणा आहे.
उत्तर द्याहटवा